महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन आजपासून नियमीत सुरू करण्यात आले आहे.प्लास्टरच्या कामासाठी गेल्या 1 ऑगस्टपासुन मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्यात आले होते.या कालावधीत भाविकांना केवळ मुख दर्शनावर समाधान मानावे लागत होते.प्लास्टरचं काम पूर्ण झाल्यानंतर आता हे दर्शन खुलं करण्यात आलं.याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी