दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीनं डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली होती. आपल्याच पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांच्या या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र निषेध करत शहराध्यक्षांना त्यासंदर्भात एक पत्र लिहिलंय.