मुंबईच्या यलो पोलिस स्टेशनच्या सागरी हद्दीत बोट बुडाल्याची घटना घडली.या बोटीतील प्रवाशांचं युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू.आपत्ती व्यवस्थापन कक्षाने याबाबत माहिती दिली. वेरावल गुजरात इथली ही बोट असल्याची माहिती समोर येतीय.. बोटीवरील लोक मोरा इथं गेल्याची माहिती मिळतीय.. गेट वे ऑफ इंडियाच्या समोरील समुद्रात ही घटना घडली.गुजरात किनारपट्टीवर जोरदार वादळी वारा पावसामुळे समुद्र खवळला असून अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ परिसरात तुफानी वादळ उठले आहे. या वादळात सोमनाथजवळ तीन बोटी बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, समुद्रातील वादळामुळे गुजरात मधील 12 बोटिंनी वसई बंदरात आश्रय घेतला आहे. तर पालघरमधील 4 बोटी गुजरातच्या नवा बंदरात थांबल्या आहेत. बुडालेल्या बोटिंपैकी सोमनाथजवळ एका बोटीमध्ये 15 नॉटिकल मैल अंतरावर असताना पाणी शिरू लागले. इतर बोटींनी ती किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तुफानी लाटा आणि वादळामुळे अखेर ती बोट समुद्रात बुडाली.