जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये वेळेवर एसटी बस येत नसल्यामुळे विद्यार्थिनींनी रोष व्यक्त करत एसटी अडवली आहे. एसटी उशिरा येत असल्यामुळे विद्यार्थिनींचं शैक्षणिक नुकसान होतंय आणि त्याच मुळे संतप्त विद्यार्थिनींनी बोदवड बस स्थानकात एसटी बस अडवून धरली.