एकीकडे महायुतीतील आमदारांना मंत्रीपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झाली आहे तर तिकडे दुसरीकडे मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची माहिती आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचा विरोध आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि जमिनी हडपल्याचा सतत होणारा आरोप यामुळे अब्दुल सत्तार यांना यावेळेस डच्चू मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.