दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता सीबीआयने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांकडे या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांची मागणी केली आहे. याबाबत सीबीआयने मुंबई पोलिसांना अधिकृत पत्र पाठवले असून मालवणी पोलिसांना ते प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील सर्व कागदपत्रे, तपास अहवाल आणि अन्य नोंदी लवकरच सीबीआयकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. त्यानंतर सीबीआय प्राथमिक चौकशी सुरू करत दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवणार आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि सीबीआयच्या हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
CBI accelerates investigation into the Disha Salian case; seeks documents via a letter to the Mumbai Police.