अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यूप्रकरणी शासनाने अकोला आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय अधीक्षकांसह ५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे मात्र, या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाच्या नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे..रुग्णालयाचे फायर अलार्म आणि स्प्रिंकलर यंत्रणा बंद होती. महत्त्वाची बाब म्हणजे, रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागाने विद्युत विभागाकडे पाठपुरावा केला होता, मात्र विद्युत विभागाने आवश्यक फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट वेळेवर केलेच नाही. तरीही या विभागातील दोषी अधिकाऱ्यांची नावे कारवाईतून स्पष्ट न झाल्याने, 'छोट्या माशांवर कारवाई अन् मोठे मासे मोकळे?' अशी चर्चा आता सुरू झाली आहे...
Amravati Women's District Hospital Incident: 5 Health Officials Suspended Following Committee Report