Pimpri-Chinchwad मध्ये सत्ताधाऱ्यांचा आंदोलनावेळी गोंधळ, सत्ताधारी नेत्यांची NDA सरकारविरोधातच घोषणा

पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधाऱ्याचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळलाय.महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या मविचा करण्यासाठी जमलेल्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी उत्साहाच्या भरात चक्क आपल्याच NDA सरकार विरोधात घोषणाबाजी केलीय. भाजप आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे आणि सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणा देण्याच्या नादात प्रशांत शितोळे यांनी, या सरकारचं करायचं काय ? अशी घोषणा दिली. त्यावर सर्व नगरसेवक आणि आमदारांनी एका सुरात खाली डोकं, वर पाय ! म्हणत परिसर दणाणून सोडला. गोंधळ आणि सावरासावर करत शितोळे यांनी पुन्हा एकदा NDA सरकारचं करायचं काय ? अशी विचारणा केल्यावरही उपस्थितांनी पुन्हा तोच नारा दिला.

संबंधित व्हिडीओ