जळगावमध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. एकलव्य नगर परिसरातील अतिक्रमण हटवण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. महापौर दीपमाला काळे यांनी अतिक्रमण हटवण्याचा ठाम पवित्रा घेतला असताना, राष्ट्रवादी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी याला जोरदार विरोध दर्शवला आहे. याच मुद्द्यावरून प्रतिभा शिंदे व आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना घेराव घातला होता. व आदिवासी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर चर्चा करण्याच्या सूचना या दिल्या होत्या या सूचनेनुसार आज जळगाव महापालिकेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली