Chh.Sambhajinagar|जन्मदात्या पित्यानेच दोन चिमुकल्यांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकलं, शोध सुरु

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील नांदर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमनाथ रोडगे या व्यक्तीने आपल्या श्याम आणि आर्यन या दोन मुलांना फिरायला आणि खाऊ खाण्यासाठी नेल्याचा बहाणा करून जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर नेले. त्यानंतर दोघांनाही कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कालव्यात वाहून गेलेल्या दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे..

संबंधित व्हिडीओ