पालघरच्या बोईसर पूर्वेत भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बेटेगाव पोलीस चौकीसमोर, अधिकारी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या या गोदामाला लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या प्रचंड ज्वाळांसह धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगे ची घटना कळताच अग्निशमन दलाच्या सुरुवातीला दोन गाड्या आणि नंतर एक गाडी अशा तीन गाड्या घटना सही दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणली आहे. गोदामाशेजारी अवजड वाहने उभी असल्याने संभाव्य धोका अधिक वाढला होता. आगीचे कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. या घटनेमुळे बोईसर परिसरातील भंगार गोदामांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.