नाशिकच्या पालकमंत्री पदावर छगन भुजबळ पुन्हा दावा केला आहे.नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे निम्मे म्हणजे सर्वाधिक 7 आमदार आहे.रायगडमध्ये एकच आमदार असताना पालकमंत्रिपदासाठी तिथे आग्रह. मग नाशिकमध्ये सात आमदार असताना मी आग्रह करतोय, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांकडे नाशिकमध्ये पालकमंत्रिपदाची मागणी करत असल्याचंही भुजबळांनी म्हटलं आहे. पालकमंत्रिपदाबाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार असल्याचंही ते म्हणालेत.