ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात घडलीय. रामराव तेल्हारकर असे मृतकाचे नाव असून,आरोपी मुलगा शिवाजी तेल्हारकर याला पोलिसांनी अटक केलीय.काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस" असे म्हटल्याने वडील व मुलामध्ये वाद झाला...त्यानंतर जेवायला बसल्यानंतर मुलाने हत्या केलीय..