CM Devendra Fadnavis यांचा दिल्ली दौरा, Amit Shah यांच्या भेटीत काय झाली चर्चा? काय म्हणाले फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतलीय. या भेटीदरम्यान शाहांसोबत राज्यातल्या दुष्काळावर सविस्तर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. तसंच अमित शांहांनी राज्याला भरीव मदत देण्याचं आश्वासन दिल्याचंही ते म्हणालेत. राज्यातल्या 300 पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये अगोदरच दुष्काळ जाहीर झाला असून स्थायी आदेशानुसार मदत दिली जातेय. पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्राकडून मदत मिळणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आजची मुख्यमंत्र्यांची भेट महत्वाची होती..

संबंधित व्हिडीओ