Diveagar दुर्घटनेप्रकरणी मोठी Update | पाच जणांवर गुन्हा, क्लासच्या शिक्षकांवर निष्काळजीपणाचा ठपका

रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आळंदीच्या विनर्स अकॅडमीचे संस्थापक शिक्षक अमर आडक, तसेच मृणाल नरसखेडे, सबा महबूब इनामदार, शिल्पा अमर आडक आणि वैष्णवी मृणाल नरसखेडे या पाच जणांविरुद्ध दिघी सागरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहलीचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मृत विद्यार्थी राजवीर वाहिले यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. Major update in the Diveagar incident | Case registered against five individuals; coaching class teachers accused of negligence

संबंधित व्हिडीओ