अमरावतीत भरदिवसा थरारक हत्येची घटना घडलीय.. रवी नगर चौकात 17 वर्षीय शर्वरी या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने चाकूने सपासप वार केलेत.. यात मुलगी गंभीर जखमी झाली.. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. दरम्यान, आता आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.. रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने या हल्लेखोर तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला..