कांदा-लसणीच्या दराने गृहिणींच्या डोळ्यात आणलं पाणी; कांद्याचा दर 30 रूपये किलोवरून थेट 60 रुपये किलो

श्रावणात भाजीपाल्याची आवक वाढली असली, तरी कांदा-लसूणच्या दराने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणलंय!सावंतवाडी बाजारात सध्या बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र कांद्याचा दर ३० रूपये किलोवरून थेट ६० रुपये किलोवर, तर चांगल्या प्रतीचा लसूण २४० ते ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे....दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश भाज्यांचे दर स्थिर राहतील, मात्र फरसबी आणि वालीची आवक कमी झाली तर त्यांच्या दरात मोठी वाढ होऊ शकते.एकीकडे आवक वाढली, भाज्यांचे दर स्थिर... पण कांदा आणि लसणाने मात्र गृहिणींचं बजेट बिघडवलंय!

संबंधित व्हिडीओ