सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या कांद्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलो असलेला कांदा आता ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींच्या घरखर्चाचे गणित बिघडले असून, रोजच्या स्वयंपाकात कांद्याचा वापर कमी करण्याची वेळ आली आहे.कांद्यासोबतच लसणाच्या दरातही वाढ झाली आहे. बाजारात लसूण सध्या २०० ते २२० रुपये किलो दराने विकला जात आहे. याशिवाय इतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाल्याने रोजच्या बाजारहाटीचा खर्च वाढला आहे.कांदा, लसूण आणि भाजीपाल्याच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होत आहे.