धुळे शहरासह जिल्ह्यात 31 जुलैनंतर पावसाने पूर्णतः पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल 95 टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, उपलब्ध जलसाठ्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी पिके जगवली आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही, तर उभी पिके करपण्याची भीती व्यक्त होत आहे...धुळे जिल्ह्यात कपाशी, मका आणि हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.