राज्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या तुलनेत पावसाची सुमारे १४.७टक्के तूट नोंदविण्यात आली आहे....१५ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे...विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाअभावी पिकं करपू लागली आहेत...आठवडाभरात पाऊस न पडल्यास पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे....छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाची स्थिती अधिक चिंताजनक आहे....सरासरीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सुमारे ७४.५७ टक्के आहे..