महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाची स्थिती चिंताजनक बनली आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घाटमाथ्यावरील काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला असला, तरी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.