Kolhapur| जिलेबी खरेदीसाठी गर्दी, 15 ऑगस्टला कोल्हापूरकर दरवर्षी 50 ते 60 टन जिलेबी करतात फस्त

26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट, राष्ट्रीय सणांच्या दिवशी कोल्हापुरात चौकाचौकात मोठ्या प्रमाणात जिलेबीचे स्टॉल लागलेले बघायला मिळतात. या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कोल्हापूरकर सकाळी ध्वजवंदन करुन गरमागरम जिलेबी घेऊनच घरी परतत असतात. कोल्हापूरकरांच्या हा नियमच जणू अंगवळणी पडला आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने तब्बल 8 ते 10 टन जिलेबीचा खप फक्त एकच दुक्कानात होतो. यावरून या दिवशी एकूण 50 ते 60 टन जिलेबी कोल्हापुरात विकली जात असल्याचा अंदाज कोल्हापूरच्या जिलेबी विक्रेत्याने वक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ