पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेडसह दौंड तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीचा आणि त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक इाली. त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती अजित पवार यांनी दिली. त्या संदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ऊसशेती आणि मानवी वस्त्यांमध्ये वावर असलेल्या बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४० कोटींची साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.