राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटेंनी भाजपात प्रवेश केलाय.. नाशिकमध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडलाय.. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भारत कोकाटे यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांच लक्ष लागलय. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे या इच्छुक असतांनाच भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामु ळे सिन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं भारत कोकाटे यांनी म्हंटलय..