कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय महिलेची प्रसुती करणारा रँचो तुम्ही सिनेमात पाहिला असेल.. मात्र आम्ही दाखवणार आहोत मुंबईतला रिअल लाईफ रँचो ... मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. राम मंदिर रेल्वे स्टेशनवर कोणत्याही मेडिकल सुविधा नव्हत्या.. तेव्हा विकास बेद्रे हा मराठमोळा तरुण देवासारखा धावून आला.. त्याने आपली डॉक्टर मैत्रिण देविका देशमुखला व्हिडिओ कॉल केला.. डॉक्टर देविका यांनी विकास बेद्रेला व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली.. विकास बेद्रेनेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार प्रत्येक सूचनेचं पालन केलं.. आणि रेल्वे स्थानकावर तिची सुखरूप प्रसूती केली.