Mumbai मध्ये Digital Arrest, 58 कोटी लुटले; ED,CBI अधिकारी भासवत केली लूट | NDTV मराठी

मुंबईत उद्योजकाला डिजीटल अरेस्ट दाखवून 58 कोटी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सायबर क्राईम पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केलीय. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उद्योजक आणि त्याच्या पत्नीला डिजीटल अरेस्टमध्ये फसवण्यात आलं. 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान उद्योजकाने आरटीजीएसद्वारे 58 कोटी रुपये दिले. आरोपींनी 18 बँक खाती वापरुन पैसे काढून घेतले. अब्दुल नासीर खुल्ली, अर्जुन कडवासरा,जेठाराम कडवासरा अशी आरोपींची नावं आहेत..

संबंधित व्हिडीओ