धाराशिव जिल्ह्यात उसाच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. उसाच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना तब्बल पाच हजार रुपये मिळाल्याशिवाय जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेने दिलाय. याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यंदा दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले असून, दुसरीकडे उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला वाढीव दर मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी संवाद साधला आहे.
Dharashiv | Swabhimani Shetkari Sanghatana takes an aggressive stance; why is there no price for sugarcane? Farmers ask angrily.