युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस पुरवठ्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून या गॅस पुरवठ्याचा फटका विविध घटकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे गॅस पुरवठा वेळेवर होत नसल्याने राज्य सरकारची योजना असलेल्या शिव भोजन केंद्र चालकांना देखील याचा फटका बसत असून धुळ्यातील शिव भोजन केंद्र चालकांनी आता चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे... गॅसचा पुरवठा हा वेळेवर होत नसल्याने चूल आणि इलेक्ट्रिक शेगडी चा आधार शिवभोजन केंद्र चालकांना घ्यावा लागत आहे...