दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत नवी माहिती समोर आली.या रूग्णालयातल्या 60 टक्के खाटा गरिब रुग्णांसाठी राखीव होत्या, असं असताना 20 टक्केच खाटा राखीव असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात येत होतं.60 टक्के राखीव असल्याची कागदपत्रं NDTV मराठीच्या हाती लागलेत.धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देणं कायद्यानं बंधनकारक आहे.मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलंय.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे एक धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे, त्याला गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ६० टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.