Pune Rain| Khed च्या गाडकवाडीत ढगफुटीसदृश पाऊस, मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचा पूर

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गाडकवाडी गावात अचानक ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले असून रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत आहे. पाण्याचा वेग इतका होता की अनेक घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य आणि धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असून नुकतीच लागवड केलेली कांदा पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आधी दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अतिवृष्टीचे संकट उभे राहिले आहे. ग्रामस्थांकडून नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ