शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज NDTV मराठी कार्यालयातील गणरायाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मराठवाड्यासह राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली. दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री स्वतः दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करत असून सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व आवश्यक निर्णय घेईल. मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मिश्कील उत्तर देत, गणरायाने मला जे हवे ते सर्व दिले आहे. त्याच्याकडे काही मागायचे नसते, तो न मागताही सर्व काही देतो, अशी प्रतिक्रिया दिली.