Mumbai Airport वर DRI मुंबईची कारवाई, 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त | NDTV मराठी

मुंबई विमानतळावर DRI मुंबईची मोठी कारवाई.डॉलर्स, पाउंड स्टर्लिंग आणि हिरे असा सुमारे ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त.विशेष गुप्त माहितीनुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी निघालेल्या ४ प्रवाशांना अडवले.सामानाच्या तपासणीत हँडबॅगमध्ये बनवलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये परकीय चलन लपवलेले आढळले.पाउंड स्टर्लिंग (GBP) आणि अमेरिकन डॉलर्स (USD) मिळून सुमारे १.९३ कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त.प्रवाशांच्या बॅगेतून ५३ छोट्या पाउचमध्ये ठेवलेले हिरे जप्त. जप्त केलेल्या हिऱ्यांची अंदाजे किंमत १.१० कोटी रुपये.प्रवाशांनी परकीय चलन आणि हिरे कस्टम्सकडे घोषित केले नव्हते.एवढ्या मोठ्या प्रमाणात चलन व हिरे निर्यात करण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत.पुढील तपासात हवाला ऑपरेटर आणि चलन पुरवणारी व्यक्तीही ताब्यात.हवाला ऑपरेटरसह एकूण ६ जणांना अटक.कस्टम्स कायदा १९६२ अंतर्गत कारवाई.देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या हवाला आणि तस्करीच्या जाळ्यावर DRI ची कारवाई.

संबंधित व्हिडीओ