Election commission Press Conference| निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना काय दिली उत्तरं?

विरोधी पक्षांच्या 'मत चोरी'च्या आरोपांदरम्यान, निवडणूक आयोगाने रविवारी एक पत्रकार परिषद घेतली. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dyanesh Kumar) म्हणाले, "निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांशी समान व्यवहार करतो, कारण प्रत्येक पक्ष आयोगाकडे नोंदणी करूनच जन्माला येतो. ते पुढे म्हणाले की आयोगासाठी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष नाही, सर्व पक्ष समान आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, "निवडणूक आयोगासाठी कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष नाही हा विषय नाही. आमच्यासाठी सर्व समान आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणीही असो, निवडणूक आयोग आपल्या घटनात्मक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. असं ही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित व्हिडीओ