एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिक रहिवासी आक्रमक झाले आहेत.आसपासच्या जुन्या इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत ठोस लेखी आश्वासन द्या,मगच पूल पाडकाम सुरू करा, लेखी आश्वासन न दिल्यास पुलाचे काम करूच देणार नाही,असा निर्धार रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, सोमवारी रहिवाशांच्या मागण्यांबाबत एमएमआरडीए, पालिका, म्हाडा अधिकारयांसोबत बैठक होणार आहे. त्यात पुनर्वसनाबाबत कोणता निर्णय घेतला जातोय, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.