छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विकासकामांच्या चर्चेऐवजी हे सभागृह राजकीय संघर्षाचा आखाडा बनलं.. विषय होता शहरातील अतिक्रमण आणि रस्त्यांवर लागणाऱ्या हातगाड्यांचा.. शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता मात्र चर्चा सुरू असतानाच एमआयएम आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीमध्ये वादाची ठिणगी पडली.. त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला...एमआयएमकडून मोदींचा एकेरी उल्लेख करण्यात आला. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आलं.. दरम्यान, सभागृहाबाहेर एमआयएम नगरसेवकांनी अल्ला हू अकबरचा घोषणा दिल्या.. यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं..