काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टीका केलीय.. त्यांनी मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केलाय..चेन्नईतल्या प्रचार सभेत त्यांनी ही टीका केली.. दरम्यान, खर्गे यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.. भाजप सरकार राजकीय पक्षांना आणि विशेषतः उमेदवारांना दहशतीत ठेवतंय.. ते सीबीआय, ईडी आणि आयकर विभागासारख्या संस्थांचा वापर करत आहेत आणि त्यांचा गैरवापर करत आहेत. ते लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत, त्या संदर्भात मी बोललो.. असं स्पष्टीकरण खर्गेंनी दिलं...