Palghar Accident | टेम्पोची जोरदार धडक, मुलीला आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू | NDTV

पालघरमध्ये मुलीला आणण्यासाठी निघालेल्या अमुल नार्वेकर यांचा भीषण अपघात झालाय.. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय.. टेंभोडे येथे राहणारे नार्वेकर हे आपल्या स्कूटीवरून सेंट जॉन कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या मुलीला घेण्यासाठी जात होते.. मात्र, पालघर पूर्वेतील घोलविरा परिसरात कॉलेजजवळ भरधाव टेम्पोने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.. नार्वेकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.. दरम्यान, अपघातानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टेम्पो चालकाला स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं.. पोलिसांनी आरोपी टेम्पोचालक हरिश्चंद्र कोदे याला अटक केलीय.. तर टेम्पो जप्त करण्यात आलाय.. ट्रकचालकाकडे अवजड वाहतूक परवाना नसताना केवळ शिकाऊ परवाना असताना तो टेम्पो चालवत होता.. त्यामुळे टेम्पो चालकासोबतच कंपनी ही या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप नार्वेकर कुटुंबीयांकडून करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ