पश्चिम आशियातील तणावात काही महिन्यांपूर्वी शांतीदूताची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानला या युद्धाचा जबर फटका बसलाय.पाकिस्तानात पुन्हा एकदा इंधनदरवाढीचा भडका उडालाय. सध्या पाकिस्तानात पेट्रोल दर हे ३९० रुपये ७९ पैसे इतके तर हाय स्पीड डिझेलचे दर ४२४ रुपये ९२ पैसे इतके वाढले आहेत.त्यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सरकारकडून कठोर उपाययोजना आखण्यात आल्यात नव्या निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांपासून ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच झळ बसणार आहे. त्यामुळे इंधनाचा अनावश्यक वापर रोखणे आणि गैर-आवश्यक खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाक सरकारने कंबर कसली आहे.