एकीकडे भारत नमत नाही हे पाहताच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ अस्त्राला अधिक धार देण्याचा प्रयत्न केलाय. भारतावर त्यांनी अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलीय. आता भारतीय मालावर अमेरिकेत एकूण ५० टक्के कर लागेल, यातील २५ टक्क्यांची अंमलबजावणी गुरुवार पासून तर उर्वरीत टॅरिफची अंमलबजावणी २१ दिवसांनंतर होणार आहे. अमेरिकेच्या या दबावाला भारताकडूनही चोख उत्तर देण्यात आलंय. भारत सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांचं, जनतेचं हिच जपणार असा संदेश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. थोडक्यात आता अमेरिकेच्या या दबावापुढे भारतही फार नमतं घेणार नाही हे स्पष्ट झालंय.