ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांना १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा गौप्यस्फोट केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी, शरद पवारांच्या वक्तव्याचा संबंध काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जोडला आहे.