241 कोटींची जमीन कुणाची? Bhumre यांच्या चालकाच्या नावाने 'हिबानामा' | NDTV मराठी

शिंदेसेनेचे खासदार संदिपान भुमरे आणि त्यांचे पुत्र, आमदार विलास भुमरे यांच्या चालकाची, जावेद शेख याची, नवी माहिती आता समोर आली आहे. हैदराबाद येथील सालारजंगकडून हिबानामा (भेटपत्र) स्वरूपात मिळालेल्या जमिनीची नेमकी किंमत किती, यावर आतापर्यंत वेगवेगळे आकडे सांगण्यात आले. मात्र, प्रथमच जावेद शेखला हिबानामाद्वारे मिळालेल्या या जमिनीचे अधिकृत शासकीय मूल्यांकन समोर आले आहे. या जमिनीचे शासकीय मूल्यांकन तब्बल २४१ कोटी ६९ लाख ५१ हजार ४०८ रुपये इतके आहे, तर याच जमिनीचा बाजारभाव अंदाजे २ हजार कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित व्हिडीओ