धुळ्यातील एका १३ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मुलगी गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असूनही, पोलीस योग्य प्रकारे तपास करत नसल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी भाजप आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे.