'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते, यावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली. या वादावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, 'ठाकरे कुठे बसले यावरून राजकारण करण्याची गरज काय?' असा सवाल त्यांनी विचारला आहे.