रागासा या यंदाच्या हंगामातील सर्वाधिक शक्तीशाली वादळाचा सामना केल्यानंतर आता दक्षिण चीन समुद्रात आणखी एक वादळ तयार झालं. आणि त्यानं फिलीपाईन्सला पुन्हा एकदा झोडपून काढलं. बुआलोई हे वादळ फिलीपाईन्सच्या किनाऱ्यावर धडकलं आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला यात सुमारे ४ जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास चार लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलंय.