पुण्यात निलेश घायवळ टोळीतल्या गुंडांना पुणे पोलिसांनी धडा शिकवलाय.. घायवळ टोळीतल्या सात आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढलीय.. कोथरूड परिसरात ही धिंड काढण्यात आली.. याकारवाईवेळी घायवळच्या काही गाड्या देखील पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत.. या गुंडांनी गोळीबार आणि कोयत्याने वार केले होते त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात आली.. तर निलेश घायवाळच्या घराची झाडाझडती देखील घेण्यात आली..