युद्धभूमीवर पाकिस्तानचं कंबरडं मोडणारं, भारतीय वायू सेनेचा कणा म्हणून ओळखलं जाणारं मिग-21 वायू दलातून अखेर निवृत्त झालं. चंदीगडमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर खास कार्यक्रमावेळी मिग-21 ने शेवटचं उड्डाण भरलं. संरक्षण मंत्र्यांसह सैन्य दलातील सर्व बडे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मिग-21 चं नुसतं नाव जरी ऐकलं तर पाकिस्तानी सैन्याला कापरं भरायचं. कारण, पाकिस्तानसोबतच्या प्रत्येक युद्धात मिग-21 ने बजावलेली कामगिरी असामान्य होती. भारतीय वायू दलातील वैमानिकांसाठी हे विमान सर्वात आवडतं मानलं जायचं... पण तब्बल 63 वर्षाच्या सेवेत मिग-21 ने काय कामगिरी केली? मिग भारताला कसं मिळालं? पुढे याच मिगला 'उडणारी शवपेटी' का म्हटलं गेलं? जाणून घेऊयात या रिपोर्टमधून