भारत अमेरिका यांच्यातील व्यापार करारांवरील वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांचं टॅरिफ कार्ड बाहेर काढलंय. आता त्यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या ब्रँडेड औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. 1 ऑक्टोबर 2025 पासून हा नवा टॅरिफ लागू होईल. त्यांच्या या नव्या घोषणेमुळे जागतिक औषध उद्योग जगताची चिंता वाढीस लागली आहे. शिवाय भारतीय कंपन्यांना ही याचा फटका बसू शकतो, कारण दरवर्षी भारतातूनही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात औषधं निर्यात होतात. पाहूया काय आहे नवा ट्रम्प टॅरिफ आणि त्याचा जगासह भारतावर कायकाय परिणाम होऊ शकतो...