युक्रेनवर निर्णायक हल्ले करण्याच्या इराद्यानं युद्धाला आकार देण्याच्या प्रयत्नात असलेल्या रशियाला एक मोठा दणका बसलाय. रशियातील स्मोलेन्स्क परिसरात एका तेलवाहू गाडीला ट्रकची धडक बसली आणि या भीषण अपघातात सुमारे १८ डबे रुळांवरून खाली घसरले. इतकंच नाही तर तेल वाहून नेणाऱ्या या डब्यांना भीषण आग लागली. याचा वाहतुकीवर परिणाम झालाच मात्र मोठ्या प्रमाणात तेलही वाया गेलंय. पाहूया या अपघाताचा रशियाला नेमका कसा फटका बसू शकतो...