मान्सूनने तिकडे अंदमानात वर्दी दिली असून सहा जूनला मान्सून कोकण मार्गे महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज पुणे हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर पंधरा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता आहे. दरम्यान आज राज्यात अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केल आहे.