1 नोव्हेंबरपासून घृष्णेश्वर मंदिर सहा महिने बंद राहणार, 210 कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निर्णय

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील 12 वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात राज्य शासनाकडून तब्बल 210 कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.. या विकासकामांच्या धडाक्यामुळे 1 नोव्हेंबरपासून पुढील किमान 6 महिने श्री घृष्णेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी वेरूळ येथे घेतलेल्या बैठकीनंतर ही अधिकृत माहिती दिली आहे.. कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविकांची सुरक्षितता आणि सोयीसुविधा लक्षात घेऊन मंदिरासमोर भव्य भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे.. या कामासाठी रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद केली जाणार आहे.. 1 ऑक्टोबरपासून वेरूळ ते खुलताबाद दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली असून एमटीडीसी अभ्यागत केंद्र व वेरूळ भोसले चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या काळात केवळ शालेय बस, रुग्णवाहिका आणि दुचाकी वाहनांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी असेल. Grishneshwar Temple to remain closed for six months starting November 1; decision taken for development works worth ₹210 crore.

संबंधित व्हिडीओ